जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूण येथील शेतशिवारातील जागेबाबत कोर्टाची व फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी सुनील मंत्री यांच्याविरोधात पोलिसांना सखोल चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
मेहरूण येथील गट शिवार ७९ हि जागा फिर्यादी चंद्रशेखर मंत्री यांची आहे. जागेबाबत कोर्टात वाद सुरु होता. मात्र, समाजातील मध्यस्थांमार्फत हि जागा सुनील रामनारायण मंत्री यांनी १ कोटी २५ लाख रुपयांना घेण्याचे कबूल केले होते. त्याबाबत कोर्टात देखील माहिती दिली होती. त्यांनतर फिर्यादी चंद्रशेखर मंत्री यांनी कोर्टातील प्रकरण त्यावेळी मागे घेतले होते. मात्र सुनील मंत्री यांनी कोर्टाला दिलेला शब्द न पाळत फिर्यादीसह कोर्टाची फसवणूक केली म्हणून २९ सप्टेंबर २०१७ रोजी फिर्यादी चंद्रशेखर मंत्री यांनी न्यायालयात प्रकरण सादर केले.
या प्रकरणावर ११ जानेवारी २०२२ रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. मुगळीकर यांच्या न्यायालयात कामकाज होऊन त्यांनी, फिर्यादीच्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांना प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.तसा आहवाल कोर्टात सादर करण्याचे आदेशदेखील केले आहेत.