जळगाव (प्रतिनिधी ) ;- येथील सिंधी समाजातील लोकेश धनराज चावला याने मुंबई येथील एचआर कॉलेजमधून सीएची अंतिम परीक्षा उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे. तो फुले मार्केटमधील रामास्वामी प्लास्टिकचे आणि नेत्र ज्योती हॉस्पिटलचे ट्रस्टी धनराज चावला यांचे चिरंजीव आहेत. लोकेश चावला याच्या यशाबद्दल समाजातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








