जळगाव ( प्रतिनिधी ) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात २३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे १९३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत .
जळगाव शहर-४, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-३, अमळनेर-०, चोपडा-१२, पाचोरा-०, भडगाव -०, धरणगाव -०, यावल -०, एरंडोल -०, जामनेर-१, रावेर -०, पारोळा -०, चाळीसगाव-१, मुक्ताईनगर -०, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील १ असे २३ कोरोना बाधित रूग्ण आज जिल्ह्यात आढळून आले आहेत .
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५१ हजार ३८० कोरोना रूग्ण आढळून आले. त्यापैकी १ लाख ४७ हजार ९३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत . तर २ हजार ५९० कोरोना बाधितांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. तर सध्या जिल्ह्यात ८५१ बाधित रूग्ण उपचार घेत आहेत .