जळगाव (प्रतिनिधी ) – भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना ओजस्विनी कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी ५०० किलो रांगोळीतून प्रतिमा साकारून आदरांजली वाहिली.
ओजस्वीनी कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ४० बाय ४० या आकारात साकारलेल्या या भव्य रांगोळीच्या प्रतिकृतीत पांढरा आणि काळ्या रंगाचा वापर केला आहे. लतादीदी या भारतरत्न असल्याने यात तिरंगा ध्वज देखील साकारण्यात आला . ही भव्य रांगोळी ५ शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी २४ तासाच्या प्रयत्नानंतर पूर्णत्वास आली.
यांनी घेतली मेहनत
रांगोळीची संकल्पना ओजस्विनी कला विभागाचे विभागप्रमुख प्रा. मिलन भामरे, प्रा. पुरुषोत्तम घाटोळ, प्रा. पियुष बडगुजर, प्रा. डिगंबर शिरसाळे, प्रा. राजेंद्र सरोदे यांची आहे. रांगोळी रेखाटण्यात भूषण पाटील, आयुषी जैन, लक्षिता जैन, कुणाल जाधव, रिटा घुगे, सागर चौधरी, ईशा भावसार, जोती सहानी यांनी सहकार्य केले. या उपक्रमासाठी के. सी. ई. चे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, मु.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य स. ना. भारंबे, सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वदोडकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी जनसंपर्क अधिकारी प्रा. संदीप केदार, प्रा. देवेंद्र गुरव, प्रा. कपिल शिंगाने, प्रा. केतकी सोनार, संजय जुमनाके आदी उपस्थित होते.