अमळनेर (प्रतिनिधी ) – एका कारमध्ये गॅस भरत असताना अचानक आग लागल्याने पाहता पाहता कार जाळून खाक झाल्याची घटना आज अमळनेरात बस स्थानक परिसरात घडली. सुदैवाने कुठलाही अनर्थ घडला नाही.
सुत्रांकडून माहिती अशी कि, , शहरातील बसस्थानक परिसरातील जुनी पोलीस लाइनीजवळ कार दुरुस्तीची गॅरेज असून याठिकाणी वाहनांमध्ये गॅस किट भरून त्यात गॅस भरत असतांना कारला दुपारी अचानक आग लागली . या आगीत कार जळून हजारो रुपयांचे नुकसान झाले असून याबाबत पोलिसांत आगीची नोंद करण्याचे काम सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.