जळगाव ( प्रतिनिधी ) – एरंडोल तालुक्यातील वैजनाथ येथील २३ वर्षीय तरूणाने शेतातच झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नितीन शालीग्राम पाटील असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.
वैजनाथ येथे नितीन पाटील कुटुंबियांसोबत वासव्यास होता. त्याचा मोठा भाऊ पुणे येथे खासगी नोकरीला असून नितीन घरी वडीलांना शेतीकामात मदत करीत होता. शेतात रात्रीची लाईट असल्याने नितीन शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. सोमवारी सकाळी नितीनचे काका भगवान पाटील त्यांच्या शेतात गेल्यावर त्यांना नितीनने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र लगेच समजू शकले नाही. त्यांनी या घटनेची माहिती आपल्या भावाला दिली. त्यांनी नितीनचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केले. मयत नितीनच्या पश्चात त्याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, विवाहित बहिण असा परिवार आहे.