जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ४६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १२३ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
जळगाव शहर-२१, जळगाव ग्रामीण-३, भसावळ-६, अमळनेर-१, चोपडा-५, पाचोरा-२, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-५, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-१, मुक्ताईनगर-१, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ४६ बाधित रूग्ण आढळले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५१ हजार २३३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४७ हजार २४७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजवर एकुण २ हजार ५८८ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर १ हजार ३९८ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.