जळगाव (प्रतिनिधी ) – बाबा तुमच्या हातातील अंगठी फार सुंदर असून मला अशीच अंगठी मला घ्यायची आहे असे सांगत एका ७५ वर्षीय वृद्धाची २४ हजार किमतीची अंगठी घेऊन भामटा दुचाकीने पसार झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, अरुण गिरधर धांडे (वय ७४ वर्ष रा. संचित रणछोड नगर जळगाव) हे ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास गणेशवाडी येथे आले होते. त्यावेळी घरी परतत असताना अनोळखी व्यक्ती दुचाकीवर येऊन त्यांना त्याने लिफ्ट देऊन पुढे एका सुमसं जागी दुचाकी लावून पाचशे रुपयांचे सुटे आहेत का ? अशी विचारणा केली. धांडे यांनी नकार दिल्यानंतर त्यांच्या हातातील अंगठीकडे भामट्याने लक्ष असल्याने त्याने अंगठी दाखवा न्हणत वृद्धाच्या बोटातून अंगठी स्वतःच्या बोटात घालून दुचाकीला किक मारून पोबारा केला. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकीधारकावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक किशोर पाटील करीत आहे.