मुंबई (वृत्तसंस्था ) – मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात, 100 कोटी कथित वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला.
या संदर्भात आज सुनावणी झाली. त्यावेळी ईडीला जामीन अर्जावर रिप्लाय फाईल करण्यासाठी इडीने आणखी वेळ मागितला, न्यायालयाने 9 फेब्रुवारीपर्यंत वेळ दिला आहे. त्यामुळे या अर्जावर आता पुढील सुनावणी 9 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
मुंबई: ईडीने अटक केल्यापासून अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये आहेत. त्यांच्या जामीण अर्जावर आज सुनावणी झाली त्यावेळी मुंबई सत्र न्यायालयात या प्रकरणातील सर्व केसची एकाच न्यायाधीशा समोर सुनावणी होणार असल्याने आज न्यायालयाने या प्रकरणातील संबंधित सर्व आरोपींची यादी बनवली त्यानुसार प्रत्येकाला वेगवेगळा नंबर देण्यात आला त्यामध्ये माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांना 15 क्रमांक देण्यात आला आहे.
अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश आणि सलील देशमुख यांना आज न्यायालयाने 5 एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर राहण्यास संदर्भात समन्स बजावला आहे.ईडीने या दोघांना अनेक समन्स बजावून सुद्धा ते कार्यालयात चौकशीसाठी न आल्याचा आरोप ईडीने केला आहे. आज सुनावणीवेळी न्यायालयाने या दोघांनाही 5 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचा समन्स बजावला आहे.