पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा पोलीस आणि महसूल विभाग यांच्याकडून आज आणि काल मध्यरात्री २ वाजता करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत तालुक्यातील हिवरखेडे बु गावा जवळील बोरी नदी पात्रात वाळू वाहतूक करणाऱ्या ८ ट्रॅकटंर जप्त करण्यात आले .
अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी रात्री २ वाजता हिवरखेडे बु गावाजवळील बोरी नदी पात्रात वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर थांबवून ठेवत पारोळाचे पोलीस निरीक्षक भंडारे, तहसीलदार अनिल गवांदे याना घटनास्थळी बोलावून घेतले होते .महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी वाळू माफियांवर कारवाई करत ८ ट्रॅक्टर पारोळा पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले.
यावेळी पारोळा शहर तलाठी निशिकांत माने, तलाठी प्रवीण शिंदे, महेंद्र पाटील, कैलास माळी, पोलीस कर्मचारी नाना पवार यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते. एका रात्रीत तब्बल ८ वाळू ट्रेकटर जप्त झाल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे तालुक्यातून अधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.
आता प्रशासन जप्त केलेल्या ट्रॅक्टर मालकांवर काय कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.