जळगाव ( प्रतिनिधी ) – टिपू सुलतान यांच्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारे आहे . त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले .
या आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य मूलनिवासी बहुजन समुदायाची दिशाभूल करणारे आहे . संघ आणि संघप्रणीत संघटनांचे प्रचारक नेहमीच समाजात द्वेष वाढवण्याचे काम करीत असतात त्यामुळे फडणवीस यांच्यावर कारवाई न झाल्यास बहुजन मुक्ती पार्टी कडून यापुढे व्यापक आणि तीव्र आंदोलन केले जाणार आहे.