जळगाव (प्रतिनिधी) –अर्धवेळ नोकरी देण्याच्या बहाण्याने एका तरुणाला तब्बल दीड लाखांचा चुना लागल्याची घटना घडली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहन गजानन पाटील (वय-१९) रा. कल्याणी नगर, निमखेडी परिसर असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. रोहन याला ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता त्याला एका अनोळखी मोबाईल नंबरच्या टेलीग्रॉम ॲपवर सुरेंद्र नावाच्या व्यक्तीने अर्धवेळ नोकरी लावण्याचे सांगितले. रोहनने फोन-पे च्या माध्यमातून एकुण १ लाख ४८ हजार ५७३ रूपये ऑनलाईन पध्दतीने ट्रान्सफर केले. ७ डिसेंबरपर्यंत सुरूच होता. यात पार्ट टाईम नोकरी मिळाली नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.त्याच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव करीत आहे.