पाचोरा (प्रतिनिधी ) तालुक्यातील कळमसरा शिवारात म्हसाळे परिसरात एका शेतातील विहिरीत एक बिबट्या आज सकाळी आढळून आल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, दयाराम तुळशीराम चौधरी. (तेली) यांच्या मालकीच्या शेतातील विहीरीत बिबट्या पडलेला आहे अशी माहिती मिळाली असता कळमसरा येथील निसर्गस्नेही दत्तात्रय तावडे यांनी दिनांक ३१ जानेवारी सोमवारी सकाळी सात वाजता शेतात जाऊन खात्री केली असता सदर विहिरीत पहिले असता बिबट्या मृतावस्थेत पाण्यावर तरंगत असल्याच्या परिस्थितीत आढळून आला.
माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी नांद्रा बिटचे वनरक्षक ठाकरे, मालखेडा बिटचे वनरक्षक सुर्यवंशी, वनमजूर अशोक राठोड यांना सोबत घेऊन यांनी घटनास्थळी धाव घेतली . त्यांनी याच परिसरातील शेतकरी शांताराम बोखारे, रमेश पाटील, गणेश खेडकर, बाबूलाल परदेशी, मंगल परदेशी, आकाश बोखारे यांच्या मदतीने दोराच्या साह्याने विहिरीत खाट (बाज) सोडून मृत बिबट्याला वर काढण्यात आले.