भडगाव ( प्रतिनिधी ) – काही दिवसांपूर्वी कजगावातील गोंडगाव रस्त्यावरील शक्ती ट्रान्सफार्मरवरील तीनशे लिटर ऑइलची चोरी झाल्याने ट्रान्सफर्मर अनेक दिवसांपासून बंद आहे ट्रान्सफर्मर बंद असल्यामुळे शेतकरी पिकांना पाणी देऊ शकत नाही पाणी मिळत नसल्याने पिकांनी मान टाकली आहे पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे बंद ट्रान्सफार्मर त्वरित चालू करावा अशी मागणी होत आहे
बंद ट्रान्सफार्मर त्वरीत दुरुस्त करावे अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल महाजन यांनी महावितरणच्या अभियंता यांना भेटून केली आहे दोन दिवसांत बंद असलेल्या ट्रान्सफार्मर चालू करण्यात येणार असल्याचे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.