चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील एका परिसरात राहणाऱ्या ७ वर्षीय चिमुकलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवार २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता चिमुकली ही खेळत असतांना अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याची माहिती मुलीच्या आईने दिली आहे. दिवसभर मुलीचा शोध घेतला परंतू कोठेही आढळून आली नाही. सायंकाळी ५ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रारी दिली. त्यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहरपोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विशाल टकले करीत आहे.