जालना ( प्रतिनिधी ) – जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्ह्यातील नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी भेट घेत विचारपूस केली .
जालना येथील शासकीय जिल्हा रुग्णालय येथे 30 जानेवारीरोजी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष दिपक डोके यांनी जिल्ह्यातील नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची , रुग्णांचे नातेवाईक व नेत्र चिकित्सक डॉ . बासा यांची सदिच्छा भेट घेतली शासकीय रुग्णालयात नेत्र तपासणीसह आवश्यकते नुसार शस्त्रक्रियेची सुविधा अविरतपणे चालू आहे , यावेळी संबंधित जिल्ह्यातील नेत्र रुग्णांनी शासकीय सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन नेत्र चिकित्सक डॉ .बासा यांनी केले आहे.