जळगाव (प्रतिनिधी ) आरपीएफ जवानाला एका वाहनधारकाने दगडाने मारून दुखापत केल्याची घटना शनिवारी घडली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज गिरधर मोरे (वय-३७) रा. धरणगाव जि.जळगाव हे आरपीएफ मध्ये नोकरीला आहे. शुक्रवारी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता नोकरीवरून घरी जाण्यांसाठी आकाशवणी चौकात वाहनाची वाट पाहत थांबले. त्याठिकाणी एक वाहनधारक धरणगाव येथे जात असल्याचे सांगितले. त्यानुसार ते चारचाकी वाहनात बसले. त्यानंतर वाहनधारकाने अचानक ‘धरणगाव जात नाही’, असे सांगितले. याबाबत वाहनधारकाला विचारले असता वाहनधारकाने जवळील दगड उचलून मनोज मोरे यांच्या डोक्याला मारला यात ते बेशुध्द झाले. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी जखमी मानेज मोरे यांच्या फिर्यादीवरून शनिवारी २९ जानेवारी रोजी अज्ञात वाहनधारकाविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.