जळगाव (प्रतिनिधी ) – राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने आज शहरातील रामेश्वर कॉलनी आदित्य चौक येथे राष्ट्रवादीच्या सदस्य नोंदणी मोहीम व लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेला मोठा प्रतिसाद लाभला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांच्या हस्ते सदस्यता नोंदणी अभियानास व १५ ते १८ वर्षे वयोगटातील युवक व युवतींसाठी कोविड लसीकरण मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक , राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी , ओबीसी सेलच्या जिल्हाअघ्य अश्विनी देशमुख , अल्पसंख्याक जिल्हाअघ्यक्ष मजहर पठाण , शहर संघटक राजु मोरे , सरचिटणीस सुनील माळी , उपाध्यक्ष अमोल कोल्हे, किरण राजपूत, सरचिटणीस रहीम तडवी, जिल्हा उपाध्यक्ष मिनाक्षी चव्हाण , अॅड. सचिन पाटील, सुशील शिंदे, संजय जाधव, संजय हरणे, जितू बागरे, शहर कार्यलय मंत्री राहुल टोके आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महानगर उपाध्यक्ष यशवंत पाटील व जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल देशमुख यांनी केले.
कार्यक्रमासाठी रामेश्वर कॉलनी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी या सदस्य नोदणी अभियानात २०३ सदस्य नोदणी झाली व १५ ते १८ वयोगटातील युवक युवतीसाठी मोफत लसीकरण मोहीमेत १८० सहभाग घेऊन लसीकरण करण्यात आले.