जळगाव ;- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात आरोग्य आणि पोलीस कर्मचारी अहोरात्र झटत असतांना मात्र दुसरीकडे यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यावल येथील कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाल्याने तिचा मृतदेह आपल्या तालुक्यात तिच्या नातेवाईकांनी आणू नये यासाठी जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांशी मोबाईलवर अश्लील शिवीगाळ करून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मोबाईलवर संभाषण रेकॉर्ड झाले आहे.
यावल येथील महिलेस जिल्हा रुग्णालयात तब्येत खराब झाल्याने सदर महिलेस २३ रोजी सायंकाळी दाखल केले होते . मात्र महिला हि कोरोना संशयित असल्याची व तिचा तपासणी रिपोर्ट येणे बाकी असताना आज सकाळी २६ रोजी तिच्यावर नेरी नाका येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी सिव्हिलच्या वरिष्ठ डॉक्टरांनी मृत महिला हि संशयित असल्याने तिच्यावर यावल येथे अंत्यसंस्कार न करता जळगावात करण्याचे सूचित केले होते . तसेच नातेवाईकांनी हे मान्य केले होते . परंतु यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून या महिलेस यावल येथे आणू नये अशा अविर्भावात अश्लील भाषेत संवाद साधत मृत महिलेच्या मुलीचा मोबाईल नंबर मागून घेतला . मात्र महिलेचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला नसून तिचा मृत्यू ह्रद्यविकाराने झाला असल्याचे तिच्या मुलाने सांगत आईला २३ मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते . मात्र त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला होता . मात्र रुग्णालय प्रशासनाने २६ रोजी मृतदेह ताब्यात दिल्याचा आरोप महिलेच्या मुलाने केला आहे . तिच्यावर जळगावातच अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या असताना नातेवाईक मात्र तिचे अंत्यसंस्कार यावल येथे करण्याचे सांगत असल्याने यावल पोलीस निरीक्षकांना याची खबर मिळाल्याने त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधून मृत महिलेच्या नातेवाईकांचा फोन नंबर मागितला. त्यावेळेस त्यांनी बोलतांना जबाबदारी झटकत अश्लील भाषा वापरल्याचे मोबाईल संभाषण रेकॉर्डवरून दिसून येत आहे.
——————————
WhatsApp-Audio-2020-04-26-at-3.34.31-PM