पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील सामनेर येथे 35 वर्षीय तरुण मजुरांचा नदीत पाय घसरल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली शौचासाठी गेलेल्या या तरुणाचा तोल गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. जंगल नामदेव गजबे (३५ , रा यशवंत नगर भडगाव ) असे मयताचे नाव आहे
ही घटना 3 दिवसांपूर्वी घडली असल्याचे सांगितले जात आहे हा तरुण सामनेर येथे गुरांचे केस कापण्यासाठी आला होता. सोबत त्याचे वडील व मामासह चार लोक होते दोन दिवसापूर्वी सकाळी शौचास गेला असता तिथे त्याचा पाय घसरल्याचे सांगितले जात आहे.सकाळी पाण्यात मृत देह तरंगत असल्याचे लोकांना दिसून आले होते पोलीस पाटील अरुण गोसावी यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला खबर दिल्यावर पो. कॉ. निवृत्ती मोरे ,संदीप सोनवणे , निलेश गायकवाड यांनी पंचनामा करून मुतदेह शवविच्छेदनसाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालय रवाना केला .