लाखोंचा मुद्देमाल जळून खाक
जळगाव ;-भुसावळ तालुक्यातील खडका गावातील औद्योगिक वसाहती मध्ये ११ वाजेच्या सुमारास वाढलेले गवत जाळत असतांना अचानक डीपीने पेट घेतला व आगीने भीषण रूप धारण करून शेजारील खुर्ची व फ्रिज बनविणाऱ्या मशनरी डीस्को इंटरप्राईजेस कंपनीला जळून खाक केल्याची घटना घडली.यामध्ये अंदाजे तीन कोटीचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अधिक माहिती अशी की,खडका गावातील औद्योगिक वसाहतीमध्ये व्ही.फोर.यु.सेल ह्या कंपनीचा मालक सकाळी वाढलेले गवत जाळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली? गवत जाळत असतांना कंपनीत जाणारी केबल व डीपीने अचानक पेट घेतल्याने ती आग केबलव्दारे पुढे जाऊन शेजारील डिस्को इंटरप्राइजेस कंपनीला लागली.यामध्ये खुर्च्या व फ्रिज बनविण्याच्या मशनरी तसेच दोन ट्रक समान भरलेल्या जळून खाक झाल्या आहे. डिस्को इंटरप्राइजेस कंपनी कन्हैयालाल मकडीया यांची आहे.या भीषण आगीमुळे अंदाजे तीन कोटीचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.आग विझविण्यासाठी भुसावळ नगरपरिषद अग्निशामक दलाचे दोन वाहन ,दिपनगरचे दोन वाहन , ऑडनन्स फॅक्टरीचे दोन वाहन तर चाहेल हॉटेल मालकाचे ट्रॅकटरच्या चार फेऱ्या मारण्यात आल्यानंतर आग आटोक्यात आली.याबाबत पोलीस स्टेशनला अद्याप दाखल करण्यात आलेले नाही.