जामनेर (प्रतिनिधी ) – भाजपतर्फे आज महा वितरण कंपनीच्या विरोधात आ. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
राज्य शासनाने महिनाभराच्या आत विजेच्या समस्या सोडवल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडू व अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा आमदार गिरीश महाजन यांनी मोर्चा प्रसंगी दिला .
यासंदर्भात तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, भाजपा जेष्ठ नेते गोविंद अग्रवाल, नगराध्यक्ष साधना महाजन, जि. प. सदस्य अमित देशमुख,माजी जि. प .अध्यक्ष दिलीप खोडपे, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, भाजपा गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, पंचायत समिती सभापती जलाल तडवी, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, रमेश नाईक, विलास पाटील यांच्यासह पंशेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.