जळगाव ( प्रतिनिधी ) – शिवाजीनगर येथे शिववंदन फाउंडेशनकडून भारतमाता प्रतिमा पूजन करून प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला.
शिवाजीनगर येथे ज्येष्ठ नागरिक व महिला तसेच तरुण वर्गाकडून ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महिलांच्या हस्ते भारतमातेचे प्रतिमा पूजन करून ‘भारत माता की जय’ व ‘वंदे मातरम’ या घोषणांनी जयघोष करण्यात आला. या प्रसंगी शिववंदन फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष विजय राठोड, उपाध्यक्ष विशाल वाघ, माजी नगरसेवक संजय राठोड, अंकुश कोळी, विजय पवार , संदीप पवार , संजय शिंपी, सागर उपाध्ये, दिवेश चौधरी, नरेंद्र शिंदे, सुनील कोरडे, प्रल्हाद सोनवणे, सुजित कुलकर्णी, वाल्मीक वाघ, प्रसाद शुक्ल, अतुल माळी, आशिक जोहरे, स्वामी कोरडे, तेजस शुक्ल , ज्येष्ठ नागरिक डी पी पवार, राजेंद्र दीक्षित, मोहन कुलकर्णी, सुरेश पवार, राजेंद्र कीर्तने, अभय पाठक, गोटू टेलर, सुरेश सोनवणे, योगिता शुक्ल, सुजाता पाठक, मंगलाबाई राठोड, भावसार काकू, वैशाली पवार, कोरडे आजी आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.