जळगाव (प्रतिनिधी ) -येथील बस्थानकासमोर आज प्रजासत्ताकदिनी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलाबाळांसह आज भीक मांगो आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यात येणार आहे.
जळगावात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह ‘भीक मांगो’ आंदोलन सुरु केले आहे. भीक मागून जमा झालेली रक्कम राज्य सरकारला देण्यात येणार आहे.एसटीच्या विभागीय कार्यालयापासून एसटी स्टँडपर्यंत भीक मागून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांनी दुकानदार, पादचारी, वाहनधारक अशा सर्वांकडे भीक मागितली. लहान बालकहि या आंदोलनात सहभागी झाले होते.