जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्य उत्पादन शुल्क खात्याने धरणगावातील बनावट मद्य निर्मिती करणारा कारखाना उघडकीस आणल्यानंतर अटक करण्यात आलेला आरोप आणि बनावट दारू निर्मितीचा मास्टरमाईंड गौतम माळीची पोलीस कोठडी २७ जानेवारीपर्यंत वाढली आहे. आधी त्याला २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती .
गौतम नरेंद्र माळी हा बनावट दारू निर्मितीचीच्या रॅकेटमधील आंतरराज्यीय टोळीचा सदस्य आहे . आधी त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत मात्र आतापर्यंत तो हाती लागत नव्हता . धरणगावात टाकलेल्या धाडीत त्याला रंगेहाथ पकडण्यात आले होते . अन्य काही राज्यांमधील पोलिसही त्याच्या शोधात होते गुजरात आणि महाराष्ट्रात त्याची टोळी हा उदयॊग करीत असल्याचे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे . जळगाव जिल्ह्यात वावडदा आणि धुळे जिल्ह्यातील सोनगीर , गुजरात राज्यातील नेत्रम जिल्हा , नर्मदा जिल्हा येथे या आधी झालेल्या कारवाईतही तो पोलीस आणि राज्य उत्पादन खात्याच्या हिटलिस्टवर होता मात्र फरार होण्यात त्याला यश मिळत होते . आता धरणगावातील गुन्ह्यासाठीची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला गुजरात पोलीस ताब्यात घेऊ शकतात . त्याच्या टोळीची महाराष्ट्रातील व्याप्ती उघडकीस आल्यावर आणखी काही गुन्हेगारांना अटक केली जाण्याची शक्यता आहे . आता वाढलेल्या २ दिवसांच्या पोलीस कोठडीच्या मुदतीत त्याच्याकडून यादृष्टीने चौकशी करून आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे .
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धरणगाव येथील बनावट मद्य निर्मिती गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींपैकी ‘मास्टर माइंड’ गौतम माळीचे साथीदार जिल्हा व राज्याबाहेरचे आहेत. गुन्हयाची व्याप्ती मोठी असून यात आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असल्याचे तपासात समोर आलीय. दुसरीकडे चौघां संशयित आरोपींचे जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत.
गौतम माळीला (वय ३२ , रा. थवा, ता. नेत्रंग, जि. भरुच, (गुजरात) ह.मु. साईगजानन पार्क, धरणगाव ) आज पुन्हा २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. भुपेंद्र गोकुळ पाटील (वय २९ , धरणगाव), कडु राजाराम मराठे (वय ४०, धरणगाव), भास्कर पांडुरंग मराठे (वय ६३ , रा. धरणगाव) या तिघां आरोपींची १ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. सचिन मधुकर पाटील (वय ४२ , रा. पाळधी ) यानेदेखील जामीन अर्ज दाखल केला होता. परंतू न्यायालयाने चौघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तपास करणारे पथक गौतमकडून अद्याप गुन्हयांची पूर्ण माहीती घेत असून त्यांच्याकडून अजून काही मुद्देमाल हस्तगत करायचा आहे. गौतमचे साथीदार जिल्हा व राज्याबाहेरचे असल्याचे तपासात समोर आले आहे.
गौतमने गुन्ह्यात वापरलेले वाहने तसेच त्यास साहीत्य पुरवणारे यांचा तपास सुरु असून त्यांना देखील लवकरच अटक करण्यात येणार आहे. या आरोपींनी त्यांना मद्य तयार करण्यासाठी संजय रमण देवरे (रा. वावडदा ) हा मदत करत असल्याचे सांगीतले होते. संजय देवरेला ताब्यात घेण्यात आले होते. परंतू त्याची वैद्यकीय तपासणी केल्यावर कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली. त्यामुळे त्याला नोटीस देण्यात आली आहे. आता आरोपींची संख्या आठवर पोहोचली आहे. इतर साहित्य पुरवणाऱ्यांसह धुळ्याचा आरोपी फरार आहे.