देवकर रूग्णालयातील अभियानाला उदंड प्रतिसाद
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयातर्फे राबविल्या जाणाऱ्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया अभियानात पाचवा आठवडाही हाऊसफुल्ल गेला. या आठवड्यातले एकवीस रुग्णांवर सवलतीच्या दरात मोतिबिंदू व फेको शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
देवकर रुग्णालयातर्फे या अभियानात दर गुरुवारी केवळ 2500/- रुपयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व 6000/- रुपयात फेको शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. शस्त्रक्रियेपूर्वी आवश्यक असलेली आरोग्य तपासणी रुग्णालयातर्फे आठवडाभर मोफत केली जात आहे. मोतीबिंदूचे रुग्ण भेटण्यासाठी आपली आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी रुग्णालयात येत आहेत.
देवकर रुग्णालयामुळे शस्त्रक्रिया शक्य
अभियानात शस्त्रक्रिया झालेले पष्टाणे ( धरणगाव) येथील विकास पाटील यांनी सांगितले की, डोळ्यावर मोतीबिंदू आल्याने मी आधी चोपड्यात डोळ्यांची तपासणी केली होती. मात्र मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी मला 15 ते 20 हजार रुपये खर्च सांगण्यात आला होता. एवढा आर्थिक खर्च पेलवणारा नसल्याने वर्षभरापासून मी शस्त्रक्रियेविना होतो. नंतर देवकर रुग्णालयातील अभियानाची माहिती मिळाली. येथे आल्यानंतर अवघ्या 2500/- रुपयात माझी शस्त्रक्रिया झाली आणि मला नवी दृष्टी मिळाली, केवळ देवकर रुग्णालयामुळे हे शक्य झाले, याबद्दल रुग्णालयाचे मी मनापासून आभार मानतो.