यावल (प्रतिनिधी) दुचाकीवरून महिलेची पर्स चोरून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकुण ७२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार किनगाव रोडवर घडला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनीषा विजय खंबायत (वय-३०) रा. किनगाव ता. यावल हमु नाशिक या महिला बुधवारी १९ जानेवारी रोजी सायंकाळी नंदोई भाऊ दिनेश दिगंबर लिंबायत यांच्यासोबत दुचाकीने किनगाव येथे जात असताना त्यांच्या दुचाकीला लावलेल्या पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली. यात सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याच्या रिंगा आणि रोकड असा एकुण ७२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल पर्ससहित चोरून नेला आहे. याप्रकरणी मनीषा खंबायत यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. तपास सहायक फौजदार अजिज हमीद शेख करीत आहे.