जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील नवल कॉलनीतून ट्रॅक्टरची बॅटरी चोरणारा आरोपी बारकाईने माग काढून २ महिन्यांनी पकडला आहे .
23/11/2021 रोजी दिलीप शिवप्रकाश चांगरे ( रा नवल कॉलनी ) यांच्या ट्रॅक्टर मधील बॅटरी २३ नोव्हेंबर रोजी चोरी गेली होती. त्यांचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात भाग 5 गुरनं. 745/2021 भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चोरीस गेलेली एक्साईड कंपनीची बॅटरी आरोपी आतीष नरेश भाट ( रा नवल कॉलनी ) याने चोरली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास अटक करुन त्याचे ताब्यातुन बॅटरी हस्तगत करण्यात आली ही कारवाई पो नि प्रताप शिकारे, यांचे मार्गदर्शनाखाली सफौ. अतुल वंजारी, पोना हेमंत कळसकर, सुधीर सावळे, विकास सातदीवे, योगेश बारी, चंद्रकांत पाटील यांनी केली.