रुग्णांची होणार मोठी आर्थिक बचत
जळगाव (प्रतिनिधी ) – मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानाला रुग्णांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने आता देवकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे शस्त्रक्रिया महाअभियान राबविले जात आहे. जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसापासून राबविल्या जाणाऱ्या या अभियानात सर्व शस्त्रक्रिया अगदी माफक दरात केल्या जात आहेत.
सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य व आयुष्मान भारत योजना असल्या, तरी अनेक महत्त्वाच्या शस्त्रक्रियांचा यात समावेश नाही. परिणामी रुग्णांना अशा शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठी आर्थिक किंमत चुकवावी लागत आहे. यामुळे बरेच रुग्ण शस्त्रक्रिया न करता दुखणे अंगावर काढत आहेत. ही परिस्थिती पाहता मोतीबिंदूप्रमाणे अत्यंत कमी खर्चात विविध शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय देवकर रूग्णालय प्रशासनाने घेतला आहे. येथे रुग्णांना पंचतारांकित वैद्यकीय सेवा मिळून त्यांची मोठी आर्थिक बचतही होणार आहे.
अशा शस्त्रक्रिया असे दर
हार्निया रु. 17000/-
हायड्रोसिल रु12000/-
मुळव्याध, भगंदर, फिशर रु. 12000/-
कृत्रिम गुडघा व खुबा रोपण रु. 99999/-
स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र विभाग
नॉर्मल डिलिव्हरी रु. 5000/-
सिझेरियन रु. 15000/- गर्भपिशवी काढण्यासाठी रु. 17000/-
कुटुंब नियोजन 5000/-
इतर ठिकाणी 15000 रुपयात होणारी संपूर्ण आरोग्य तपासणी अर्थात
हेल्थ चेक अप फक्त रु. 7999/-
संपूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने शरीर शुद्धीकरणासाठी
पंचकर्म रु. 3000/-
रेडिओलॉजी विभाग सिटीस्कॅन रु. 900/-पासून पुढे.
सोनोग्राफी रु 300/-
एक्स-रे रु. 150/-
शस्त्रक्रियेदरम्यान लागणारी सर्व औषधी रुग्णांची निवास व भोजन व्यवस्थाही देवकर रुग्णालयात मोफत करण्यात आली आहे. रुग्णांनी शस्त्रक्रियेसाठी असलेल्या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिरसोली रस्त्यावरी soल श्री गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.