मुंबई (वृत्तसंस्था) – केडीएमसीत दिवसेंदिवस कोरोनाबधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामध्ये कल्याण डोंबिवलीसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केडीएमसीने काही डॉक्टर संघटनांच्या मदतीने कल्याण-शीळ रोडवर खाजगी निऑन हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. निऑन हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या उपचारानंतर कल्याण मधील एका कुटुंबातील 4 कोरोना बाधित बरे झाले आहेत. या कुटुंबातील सर्व सदस्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टर आणि हॉस्पिटल स्टाफने टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करत त्यांना घरी पाठवले.