जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात सोमवारी ( १७ जानेवारीरोजी ) दिवसभरात २१७ बाधित रूग्ण आढळून आले आहेत . तर ८९ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे.
जळगाव शहर-८८ , जळगाव ग्रामीण- ०३ , भुसावळ -६० , अमळनेर- ०९ , चोपडा- २० , पाचोरा -०५ , भडगाव – ० , धरणगाव -० , यावल- ० , जामनेर-० , एरंडोल – ०१ , रावेर-०५ , पारोळा – ०५ , चाळीसगाव -१८ , मुक्ताईनगर – ०३ , बोदवड -० , आणि इतर जिल्ह्यातील ० असे एकुण २१७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४५ हजार ३७६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ५४७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १३०२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहेत. आज जिल्ह्यात कोरोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.