जळगाव ( प्रतिनिधी ) – प्रलंबित निवडणूक प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून आता त्रुटीपूर्ततेसाठी खास मोहीम १५ जानेवारीरोजी राबवली जाणार आहे .
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , ८ , १२ व १३ जानेवारीरोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विशेष मोहिम राबविण्यात आली होती. त्यास अल्पसा प्रतिसाद मिळाल्यामुळे १५ जानेवारीरोजी अंतिम मोहीम राबविण्यात येत आहे. या तारखेला उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुळ कागदपत्रांची पुर्तता करण्याकरीता अंतिम संधी देण्यात येत आहे. दक्षता पथक व सुनावणीसाठी प्रलंबित अर्जदारांना स्वतंत्र संपर्क साधण्यात येईल. या कालावधीमध्ये आवश्यक त्रुटीपूर्तता करुन घेणे अर्जदाराचो जवाबदारी राहील. जुटीपूर्तता व आवश्यक ती कादपत्रे सादर न केल्यास होणा-या नुकसानीस अजंदार जबाबदार राहील असे जिल्हा जात प्रमाणपत्र समितीव्दारे कळविण्यात आले आहे.
ज्या उमेदवारांनी नियम-३७ चे प्रमाणपत्र ब जातीविषयक कागदपत्रे , पुरावे सादर केलेले आहेत. अशा उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन अर्जामध्ये नमुद केलेल्या ईमेल आयडीवर पाठविण्यात आले आहेत. असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी यांनी कळविले आहे.