हैद्राबाद (वृत्तसंस्था) – देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आज मुस्लीम बांधवांनी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी जमू नये, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे असे आवाहन केले आहे.
यावेळी बोलताना त्यांनी, तेलंगणातील सायंकाळी ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कर्फ्यूबाबत आठवण करून देताना राज्यात सायंकाळी ७ नंतर कर्फ्यू लागू होत असल्याने या वेळेमध्ये कोणालाही घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाही. असं सांगितलं. तत्पूर्वी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी गत मंगळवारपासून राज्यभरात सायंकाळी ७ ते सकाळी ६ पर्यंत कर्फ्यू लावण्याचा निर्णय जाहीर केला होता. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांनी कर्फ्यूचे पालन न केल्यास कर्फ्यूच कालावधी २४ तासांचा करून उल्लंघन करणाऱ्यांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ अशी तंबी देखील दिली होती.