जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील वावडदा येथील एल. एच. पाटील इंग्लिश मेडियम स्कुलमधील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण आज करण्यात आले .
इयत्ता 9 वी ते 12 वी च्या 15 वर्षे ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. 68 विद्यार्थी यांनी लाभ घेतला
या लसीकरण शिबिरास विद्यालयाचे चेअरमन एल.एच.पाटील, आरोग्य सेवक सलीम पिजारी, आरोग्य सहायक ए. सी. पाटील, आरोग्य सेविका सुनिता सपकाळे व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या . या सर्वांचे मुख्याध्यापिका जयश्री पाटील यांनी स्वागत केले आणि लसीकरणाचे फायदे व लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन दिपक सराफ यांनी केले. लसीकरण यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले.