भडगाव ( प्रतिनिधी ) – तब्बल बावीस महिन्यानंतर आजपासून सुरू झालेल्या भुसावळ इगतपुरी गरीबरथ रेल्वेगाडीचे कजगावकरांनी स्वागत केले
रेल्वे चालकाचा व कजगावच्या स्टेशन मास्तरांचा शाल श्रीफळ गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कजगाव स्टेशनला परीसरातील पन्नास खेड्यावरील प्रवाशांची वर्दळ असते कोरोना लॉकडाऊनपासुन पॅसेंजर बंद करण्यात आल्या होत्या यामुळे कजगाव परीसरातील पन्नास खेड्यातील प्रवाशाची मोठी अडचण झाली होती दरम्यान दि.१० जानेवारीपासुन भुसावळ इगतपुरी ट्रेन सुरू झाल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे
आज या ट्रेनच्या स्वागतासाठी कजगाव येथे शासनाच्या निर्बंधांचे पालन करीत नागरिक जमले होते याप्रसंगी सर्वपक्षीय युवा कार्यकर्त्यांनी ट्रेन चालकासह स्टेशन मास्तरचा शाल श्रीफळ गुच्छ देऊन सत्कार केला बालक व महिलांनी मेमु ट्रेन कशी असते हे पहाण्यासाठी स्टेशनच्या बाहेर गर्दी केली होती मात्र प्रत्येक व्यक्ती अंतर ठेऊन उभे होते.