रुग्णांवर होणार मोफत व अत्यल्प दरात उपचार
जळगाव (प्रतिनिधी ) – कळमसरे (ता. पाचोरा) येथे श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयातर्फे रविवारी 559 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात आढळून आलेल्या रुग्णांवर देवकर रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत व योजनेत बसत नसलेल्या रुग्णांवर अत्यल्प दरात उपचार केले जाणार आहेत.
शिबिराचे उद्घाटन माजी पालकमंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिलीप वाघ, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे संजय गरुड, राष्ट्रवादीचे जळगाव महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, अल्पसंख्याक विभागाचे एजाज मलिक, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मीक पाटील हे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन कळमसरे येथील सरपंच अशोक चौधरी, व महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष वंदनाताई चौधरी यांनी केले होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना श्री देवकर म्हणाले, की जळगाव जिल्ह्यात ना नफा ना तोटा तत्त्वावर चालविले जाणारे देवकर हॉस्पिटल हे एकमेव आहे. येथे महात्मा फुले योजनेअंतर्गत अनेक आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. योजनेत न बसणाऱ्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया सुद्धा अत्यल्प दरात येथे केल्या जात आहे. गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी आर्थिक झळ बसू नये, या उद्देशाने देवकर रुग्णालय काम करीत आहे. यापुढेही गोरगरिबांच्या निरामय आरोग्यासाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर रुग्णालय चालविले जाणार आहे. त्यामुळे रुग्णांकडून देखील कौतुक होत आहे. माजी आमदार वाघ व संजय गरुड यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
आरोग्य तपासणी शिबिरासाठी महिला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, सरपंच अशोक चौधरी, ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, रमेश कोळी, बाळू सावंत, उद्धव माळी, भगवान हटकर, शिवाजी घुले, योगेश वाघ, बबलू पैलवान, संदीप निकम, उज्वल निकम, भैया पाटील, दिलीप आप्पा, दीपक जोहरे, गणेश पांडव, डॉ निंबाळकर, डॉ पृथ्वीराज पाटील यांचे सहकार्य लाभले.