यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील टाकरखेडा गावाच्या शिवारातून शेती साहित्य चोरीस जात असून त्वरित चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी फौजदार विनोद खांडबहाले यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावल तालुक्यातील किनगाव , डांभुर्णी , चिंचोलीसह विविध गावांच्या शिवारातून शेती साहित्यांची मोठया प्रमाणावर चोरी होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहे. टाकरखेडा शिवारातूनदेखील शेती साहित्याची चोरी करण्यात आली आहे. टाकरखेडा येथील शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आमचे शिवारातून स्प्रिंकलर सेट, पाण्याच्या टाक्या व नळी तसेच विद्युत मोटरच्या वायरी असे साहित्य चोरीस गेले आहे. या वारंवार होणाऱ्या चोऱ्या आणि चोरट्यांचा शोध घेऊन वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. या निवेदनावर विजय चंद्रकांत चौधरी, रामचंद्र सुधाकर चौधरी, समाधान चौधरी, विलास काशिनाथ चौधरी या शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.