मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या पियुश हळदे याला राज्य उत्पादन विभागाच्या भुसावळच्या पथकाने अटक केली त्याच्याकडून बनावट विदेशी मद्यसाठा व एक मोटर सायकल असा रु. १,०२,८६२/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला
मुक्ताईनगर -बोदवड रस्त्यावर मोटरसायकलने बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची गुप्त खबर राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ विभागाच्या पथकाला मिळाली होती. पथकाने सापळा रचून मुक्ताईनगर -बोदवड रस्त्यावरमोटर सायकलने बनावट विदेशी मद्याची वाहतुक करतांना पियुश हळदे यांस अटक केली. पुढील तपास केला असता हॉटेल साई गजानन ढाबा येथुन बनावट विदेशी मद्यसाठा व मोटरसायकल असा रु. १,०२,८६२/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पियुश गणेश हळदे (वय २५ वर्ष रा.मुक्ताईनगर) व अनंत गणेश वाढे (रा.चिखली, ता.मुक्ताईनगर) यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांर्तगत कारवाई करुन आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात मद्य तस्करांची टोळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागीय निरीक्षक सुजित कपाटे, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, विभागिय पथकाचे जवान व वाहनचालक सागर देशमुख, सहाय्यक . दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ, जवान विठ्ठल हाटकर यांच्या पथकाने केली पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क, विभागीय निरीक्षक सुजित कपाटे हे करीत आहेत.