यावल ( प्रतिनिधी ) – रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणाऱ्या तरूणाच्या हातातून १२ हजार ४०० रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात दोन भामट्यांनी दुचाकीवर येवून हिसकावून नेल्याची घटना उघडकी आली यावल पोलीसात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद तौफीक इसहाक कच्छी (वय-२१ ) हा रा. डांंगपुरा यावल येथे कुटुंबियासह वास्तव्याला आहे. शनिवारी सकाळी यावल शहरातील मनुदेवी मंदीरासमोर मोहम्मद कच्छी हा मोबाईलवर मित्राशी बोलत असतांना त्याच्या पाठीमागून अज्ञात दोन चोरट्यांनी दुचाकीवर येवून हातातील १२ हजार ४०० रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून नेला. आरडाओरड केली परंतू चोरटे मोबाईल घेवून पसार झाले होते. अज्ञात चोरट्यांविरोधात रात्री यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो उ नि विनोद खांडबहाले करीत आहेत .