जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील प्रथितयश डॉ परीक्षित बाविस्कर यांच्या अरूश्री हॉस्पिटल क्रिटिकल ट्रॉमा केअर सेंटर येथील ऑक्सिजन जनरेटर प्लँन्टचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
हवेतून ऑक्सिजन शोषून संकलित पाहणाऱ्या या प्रकल्पाची आणि अरूश्री हॉस्पिटल क्रिटिकल ट्रॉमा केअर सेंटर येथील ऑपरेशन थिएटरसह सर्व आधुनिक सुविधांची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि डॉ प्रताप जाधव यांनी केली . येथील उपकरणे आणि कार्यपद्धतीची प्रशंसा उभयतांनी केली
आज दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या उदघाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत , पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एस चव्हाण , एफ डी चे सहाय्यक आयुक्त विलास तासखेडकर , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शंकर जमादार , जळगाव जनता बँकेचे संचालक सतीश मदाने आणि डॉ प्रताप जाधव हे मान्यवर उपस्थित होते.