जळगाव (प्रतिनिधी) – माजी मंत्री तथा जामनेर मतदारसंघाचे आमदार गिरीश महाजन यांच्या कोरोना नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी खबरदारी म्हणून कोरोना प्रतिबंधक चाचणी करून घ्यावी असे आवाहन आमदार गिरीश महाजन यांनी केले आहे.
आमदार गिरीश महाजन हे गेल्या दोन दिवसांपासून विविध विकास कामांच्या बाबत मतदारसंघात दौरे करत आहेत. तसेच शनिवार दि. ८ जानेवारी रोजी त्यांच्या हस्ते तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन होणार होते. याबाबत तयारी देखील करण्यात आलेली होती. मात्र शनिवारी सकाळी त्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल आला आहे. हा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांनी तातडीने स्वतःला कोरोंटाईन करून घेतले आहे.
याबाबत त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांच्याशी चर्चा करून कोरोना महामारीच्या आजारातून बरे होण्यासाठी विविध टिप्स जाणून घेतल्या.