जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या जिल्हा प्रशासनाने आज जाहीर केल्या आहेत .
जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार १ जानेवारी २०२२ या पात्रता दिनांकावर या याद्या जाहीर करण्यात आल्या असून सर्व मतदान केंद्रे , विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसह जिल्हा निवडणूक कार्यालयात या मतदार याद्या मतदारांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत .
चोपडा मतदारसंघात १ लाख ६३ हजार ६०० पुरुष , १लाख ५४ हजार ७६२ महिला आणि अन्य ४ अशा ३ लाख १८ हजार ३६६ मतदारांची नोंदणी झाली आहे . रावेर मतदारसंघात १ लाख ५३ हजार २८० पुरुष , १ लाख ४२ हजार ८८१महिला आणि अन्य ० अशा २ लाख ९६ हजार १६१ मतदारांची नोंदणी झाली आहे . भुसावळ मतदारसंघात १ लाख ६२ हजार ६५४ पुरुष , १ लाख ४९ हजार ९४ महिला आणि अन्य २७ अशा ३ लाख ११ हजार ७७५ मतदारांची नोंदणी झाली आहे. जळगाव शहर मतदारसंघात २ लाख २ हजार ४५९ पुरुष , १ लाख ८२ हजार ७९५ महिला आणि अन्य २२ अशा ३ लाख ८५ हजार २७६ मतदारांची नोंदणी झाली आहे . जळगाव ग्रामीण मतदारसंघात १ लाख ६२ हजार ९२९ पुरुष , १ लाख ४९ हजार ९३४ महिला आणि अन्य २ अशा ३ लाख १२ हजार ८६५ मतदारांची नोंदणी झाली आहे . अमळनेर मतदारसंघात १ लाख ५४ हजार ६३६ पुरुष , १ लाख २३ हजार ९१० महिला आणि अन्य ४ अशा २ लाख ९८ हजार ५५० मतदारांची नोंदणी झाली आहे . एरंडोल मतदारसंघात १ लाख ४६ हजार ६५० पुरुष , १ लाख ३६ हजार ९५९ महिला आणि अन्य २ अशा २ लाख ८३ हजार ६११ मतदारांची नोंदणी झाली आहे . चाळीसगाव मतदारसंघात १ लाख ९१ हजार २९२ पुरुष ,१ लाख ७० हजार १७२ महिला आणि अन्य २४ अशा ३ लाख ६१ हजार ४८८ मतदारांची नोंदणी झाली आहे . पाचोरा मतदारसंघात १ लाख ६४ हजार २४८ पुरुष , १ लाख ५१ हजार ७४ महिला आणि अन्य २ अशा ३ लाख १५ हजार ३२४ मतदारांची नोंदणी झाली आहे . जामनेर मतदारसंघात १ लाख ६१ हजार ८५८ पुरुष , १ लाख ४८ हजार ३८० महिला आणि अन्य ६ अशा ३ लाख १० हजार २४४ मतदारांची नोंदणी झाली आहे . मुक्ताईनगर मतदारसंघात १ लाख ४८ हजार ७५८ पुरुष , १ लाख ३८ हजार ७५४ महिला आणि अन्य १ अशा २ लाख ८७ हजार ५१३ मतदारांची नोंदणी झाली आहे
जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघांमधील नोंदणी झालेल्या मतदारांची संख्या आता ३४ लाख ८१ हजार १७३ झाली आहे त्यापैकी १८ लाख १२ हजार ३६४ पुरुष आणि १६ लाख ६८ हजार ७१५ महिला व अन्य ९४ मतदार आहेत .