जामनेर ( प्रतिनिधी ) – राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस दिपक रिचवाल यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे
आमदार .गिरीश महाजन यांनी त्यांचे स्वागत केले
दिपक रिचवाल यांनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर नगरपरिषद निवडणूक लढविली आहे. आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि रुमाल टाकून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, श्रीराम महाजन, बाबुराव हिवराळे, रविंद्र झाल्टे, सुरेश माळी, कैलास नरवाडे, सुनील धनगर, विलास माळी, बापू लोहार ,कैलास पालवे आदी उपस्थित होते.
संतोष माळी, शिवा मराठे, सुनील रितवाडे, राजू रितवाडे, संतोष रिचवाल, अशोक रिचवाल, प्रमोद गिरी, सुनील गिरी, राजू साठे, संजय साठे, दिनेश साठे, दिनेश वाघ, रघुनाथ माळी, शांताराम पालवे, गजानन लोहार , भाईचंद गायकवाड, सुनील गायकवाड, दिपक तायडे, राहुल राजपूत, मुन्ना पवार, सोपान गायकवाड, समाधान मोरे, संतोष दोषी , अतुल दोषी, विजय मराठे, युवराज झाल्टे, संदीप वराडे, किरण रोकडे, राजू मोरे, संदीप मोरे, किशोर जोशी, अतुल रितवाडे, संदीप रितवाडे, भागवत रितवाडे, कैलास रितवाडे, अमोल रितवाडे, आदी कार्यकर्त्यांनी यावेळी भारतीय जनता पक्षांमध्ये प्रवेश केला.