जळगाव ( प्रतिनिधी ) – माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण काढून घेऊन त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करावे या मागणीसाठी आजपासून रिपाइं ( आठवले गट ) च्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे .
या उपोषकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दीपककुमार गुप्ता यांच्या विरोधात राज्यभरात दाखल असलेल्या १० गुन्ह्यांची माहिती दिली आहे. उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की , अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात आवाज उठवल्याने दीपकुमार गुप्ता यांना पोलीस संरक्षण देण्यात आली असले तरी जिल्ह्यात अवैध वाळू उपसा सुरूच आहे. ते विनाकारण इतरांना त्रास देण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा वापर करतात. त्यांनी या कायद्यानुसार आवाज उठवलेला असला तरी आतापर्यंत किती दोषी लोकांवर कारवाई झाली, याची स्वतंत्र समिती नेमून चौकशी करावी. पोलीस संरक्षण असल्याने ते कुणावरही दबाव टाकतात. त्यांचा उपद्रव वाढू नये म्हणून आधीच्या गुन्ह्यांच्या पार्शवभूमीवर त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करा. १० गंभीर गुन्हे दाखल झालेली ही व्यक्ती आतापर्यंत हद्दपार का झाली नाही ? असे असूनही त्यांना पोलीस संरक्षण का दिले जाते ? असा प्रश्न या निवेदनात विचारण्यात आला आहे.