जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथे भटक्या कुत्र्यांनी बुधवारी संध्याकाळी लहान मुलांना लक्ष्य केले. यात चार मुलांना चावा घेतल्याची माहिती मिळाली आहे. यातील दोघांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचार घेतले.
तेजस प्रवीण नेटके (वय ४), जान्हवी रवींद्र सावळे (वय ५) अशी जखमी बालकांची नाव आहे. डॉक्टरांनी त्यांना तपासून औषधोपचार केले. यावेळी नागरिकांनी सांगितले की, जळगावातील काही कॉलन्यांमधील भटके कुत्रे पकडून शिरसोली येथे सोडण्याचे प्रकार दिसून येत आहे. या ग्रामस्थांचा हा जळगावच्या महापालिकेवर संतप्त आक्षेप आहे . शिरसोली ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांना तात्काळ आळा घालून कारवाई करणे गरजेचे आहे. लहान मुलांचा जीव थोडक्यात वाचला, अशी माहिती नागरिकांनी दिली.