जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. दुसरीकडे १ रुग्णाने कोरोनावर मात केली असून आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर – ०५, , भुसावळ-०३, , चोपडा-०४, इतर जिल्हा – १, असे एकुण १३ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४२ हजार ८५४ पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार २३६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ३९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत .