जळगाव ( प्रतिनिधी ) – नुतन मराठा महाविद्यालयाजवळ तरूणी मोबाईलवर बोलत असतांना अज्ञात चोरट्यांनी हातातून हिसकाविल्याची घटना घडली. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
माधुरी धोंडू मिस्तरी ( वय 25 रा. रेणुका नगर, वरणगाव ता. भुसावळ ह.मु. प्रताप नगर जळगाव) या शिक्षण घेत आहे. सोमवारी सकाळी नूतन मराठा महाविद्यालयाजवळ मोबाईलवर बोलत असतांना त्यांच्या पाठीमागून अज्ञात दोन जण येवून त्यांच्या हातातील ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकाविला. त्यांनी आरडाओरड केली परंतू काही वेळातच दोघे अज्ञात चोरटे पसार झाले जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रात्री तरूणीने तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास स पो नि किशोर पवार करीत आहेत.









