जळगांव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिरसोली प्र. न.ग्रामपंचायतने आपली कुटुंबप्रमुखाची जबाबदारी आहे या नात्याने कुणीही कुपोषित राहायला नको या संकल्पनेतून,गावातील 10 कुपोषित बालके दत्तक घेऊन त्यांना सदृढ बनविण्याचा उपक्रम ग्रामपंचायतने हाती घेतला आहे.
या बालकांचा शारीरिक विकास व्हावा म्हणून विविध पोषक वस्तूंचे वाटप सरपंच हिलाल भिल, उपसरपंच सौ.सकुबाई पाटील, ग्रा. प. सदस्य श्रावण ताडे, शशिकांत अस्वार, रामकृष्ण काटोले, विनोद बारी, मुदस्सर पिंजारी, गौतम खैरे, श्रीमती व्दारकाबाई बोबडे, भागाबाई बारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस गावातील अंगणवाडी सेविका व प्रतिष्ठित नागरिक शेनफडू पाटील, मिठाराम पाटील, भगवान बोबडे, गोकुळ बारी, भगवान सोनार उपस्थित होते.