जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील एका कॅफेत प्रेमी युगुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असल्याची बातमी प्रसारित का केली म्हणून पत्रकार आनंद शर्मा यांना धमक्या देणाऱ्या लोकांच्या विरोधात तात्काळ कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन आज पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले.
शहरातील गणपती नगर रस्त्यावर मार्व्हल कॅफेत प्रेमीयुगलांसाठी विशेष व्यवस्था असून अश्लील चाळे चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाने छापा टाकून कारवाई केली. कॅफेत दोन युगलदेखील मिळून आले. कॅफे चालकावर कारवाईदेखील करण्यात आली. कारवाईची माहिती आणि अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया असलेले वृत्त इंडिया आपतक चॅनलने प्रसारित केले होते. नंतर संपादक आनंद शर्मा यांना व्हिडीओ वृत्त हटविणे आणि कारवाई करण्याची धमकी देणारे दोन फोन मोबाईल क्रमांक +918806301500 व +918856061322 यावरून आले होते.
पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या बातमीच्या आधारे ते वृत्त प्रसारित करण्यात आले होते. ज्या नंबर वरून पत्रकारांना धमक्या देण्यात आल्या त्या नंबरची चौकशी करून त्या व्यक्तींवर व संबंधित कॅफे चालक-मालक यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यानिवेदनात करण्यात आली आहे ,