मुंबई (वृत्तसंस्था) – करोना प्रार्दुभावामुळे पुणे जिल्ह्यात उद्योगधंदे, रोजगार बंद आहेत. त्यामुळे चाकरमान्या -बरोबरच सर्व क्षेत्रातील लोकांना रोज घरीच बसण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीवरील मालिकांचे रोजचे भाग दाखविणे बंद करण्यात आले आहे. लॉकडाउनमुळं सर्वजण घरातच आहेत. या काळात नैराश्य आलं असेल तर पुस्तकं आपले चांगले सोबती होऊ शकतात असं त्यांनी ट्विटद्वारे सुचवलं आहे.
पुस्तके आपल्या आयुष्यातील सोबती आहेत. लॉकडाऊनच्या काळात हताश न होता विविध विषयांची चांगली पुस्तके वाचावीत. पुस्तकांमधील समृ़द्ध विचारांनी आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल.
सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शरद पवार यांनी ट्विट केले आहे की,’पुस्तकं आपल्या आयुष्यातील सोबती आहेत. लॉकडाऊनच्या काळात हताश न होता विविध विषयांची चांगली पुस्तकं वाचावीत. पुस्तकांमधील समृ़द्ध विचारांनी आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! या दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला एक महत्वाचा संदेश दिला आहे.